पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गिरीश महाजन हे देशातील मोठे नेते, संजय राऊत यांचा टोला

गिरीश महाजन आणि संजय राऊत

गिरीश महाजन हे देशातील मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षाचे ५० आमदार भाजपमध्ये येत असल्याचा दावा केला आहे, असा टोला शिवसेना नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी लगावला आहे. संसदीय प्रणालीत विरोधी पक्ष टिकला पाहिजे. विरोधी पक्ष नसेल तर सत्ताधारी मुजोर होतात, असा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा दाखला देत त्यांनी म्हटले.

गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मोठे नेते भाजपत दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप चौकशीचा दबाव आणून नेत्यांना पक्षात घेत असल्याचा आरोप केला होता. त्यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते 'एबीपी माझा'शी बोलत होते.

शिवसेनेकडून आदित्य ठाकरेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार

ते म्हणाले, राजकारणात उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची पद्धत रुढ झाली आहे. मुख्यमंत्री ज्यांचा असतो, तिकडे लोक जातात. खूर्ची टिकवण्यासाठी लोक प्रवेश करत आहेत. शिवसेनेत सरसकट कोणालाच घेतले जात नाही. प्रत्येकाला पारखून आणि कोणत्याही अटीशिवाय घेतले जात आहे. इतरांकडे निष्ठा राहिलेली नाही पण शिवसेनेकडे ती आहे, हे सांगण्यास ते विसरले नाहीत. 

काँग्रेस-राष्ट्रवादी आता त्यांचे नेते जात असल्यामुळे ओरडत आहेत. पण त्यांनीही शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांना पक्षात घेतलेच आहे. २५-२५ वर्षे काम केलेली माणसे राष्ट्रवादीने घेतलीच होती. सध्या विचारधारा राहिलेली नाही. राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड हे विरोधात असल्यामुळे काम होत नसल्याचे म्हणत आहेत. पण असे नसते. 

''एक देश, एकाचवेळी निवडणूक' संकल्पना अंमलात आणणे अशक्य'

अशा प्रकारामुळे राष्ट्रवादी संपणार नाही. गळती लागली तरी त्यांचा पक्ष पुन्हा उभारी घेईल. विरोधी पक्ष टिकला पाहिजे. गिरीश महाजन हे देशातील मोठे नेते असल्यामुळे त्यांनी विरोधी पक्षाचे ५० आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला असल्याचा टोलाही लगावला.