पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा; छगन भुजबळांची मागणी

छगन भुजबळ

बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात शुक्रवारी ओबीसी जनगणनेवर चर्चा झाली यावेळी त्यांनी ही मागणी केली. छगन भुजबळ यांच्या या मागणीला विरोधकांनी देखील पाठिंबा दिला आहे. 

श्रीपाद छिंदमला सरकारचा दणका; नगरसेवक पद केले रद्द

छगन भुजबळ यांनी सांगितले की, '१९९० पासून ओबीसी जनगणेची मागणी होतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री असताना केंद्राला याबाबत प्रस्ताव दिला होता. अनेक मुख्यमंत्र्यांनीही प्रस्ताव दिला होता. त्यावर नरेंद्र मोदींची सही होती. देशात ५४ टक्के ओबीसींची संख्या आहे. मात्र असे असूनही एक नागरिक म्हणून ओबीसींच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात का नाही याची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे ओबीसी जनगणान होणे आवाश्यक आहे.' तसंच जनगणनेच्या अर्जात बदल करावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. 

दिल्ली जळत असताना गृहमंत्री कुठे होते?; शिवसेनेचा सवाल

छगन भुजबळ यांच्या या मागणीला भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. यावर बोलताना विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, 'छगन भुजबळांनी मांडलेला मुद्दा योग्य आहे. ओबीसी जनगणेला आमचे समर्थन आहे. हा धोरणात्मक निर्णय आहे. आपण सर्वांनी पंतप्रधानांकडे जाऊन जातनिहाय जनगणनेची मागणी करु.' असे सांगत लवकरच आपण पंतप्रधानांची भेट घेऊन असे फडणवीसांनी सांगितले. 

भाजप नेते नरेंद्र मेहतांविरोधात बलात्काराचा गुन्हा