पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

क्रेडिट कार्ड बिल, EMI वसुली तूर्त टाळावी, चव्हाणांची केंद्राकडे मागणी

डेबिट कार्ड (प्रतिकात्मक छायाचित्र)

कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानामुळे देशात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक व्यवहार ठप्प झाले असून अनेक जणांना  कामाशिवाय घरी बसावे लागत आहे. परिणामी येणाऱ्या काही दिवसांत बँकेतून घेतलेल्या कर्जाचे हप्ते, क्रेडिट कार्डची परतफेड करण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. देशासह राज्यातील भीषण परिस्थिती पाहता कर्ज, क्रेडिट कार्ड यासारख्या परतावा करण्यासाठी नागरिकांना मुदत वाढ मिळावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

आता फोनवरुन डॉक्टरांचा सल्ला घेता येणार, पण..

यासंदर्भात त्यांनी केद्र सरकार पत्र लिहिले आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनमध्ये सरकारने कर्जाचा हप्ता, क्रेडिट कार्ड यासारखी देणी भागवण्याला तात्पूरती स्थगिती देण्याचे आदश रिझर्व्ह बँकेने काढावे, यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, असा उल्लेख अशोक चव्हाण यांनी पत्रामध्ये केलाय. 

कोरोना : पाकिस्तानने इस्लामाबादसह अनेक प्रांतात केले सैन्य तैनात

केंद्र सरकारने त्यांची मागणी मनावर घेतली आणि आरबीआयने यावर सकारात्मक विचार केला तर अनेकांना मोठा दिलासा मिळेल. केंद्र सरकार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Minister Ashok Chavan has demanded stay on payments of EMIs debit credit card bills to give people respite amid coronavirus outbreak