पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इगतपुरी येथे मिनीबसला भीषण आग

मिनी बसला भीषण आग

मुंबईवरुन नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मिनी बसने अचानक पेट घेतला. इगतपुरी येथील हॉटेल ग्रीन लँडजवळ सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली आहे. या मिनी बसमध्ये १२ ते १५ प्रवासी प्रवास करत होते. बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. 

निवडणुकीवर बहिष्कार टाका; नक्षलवाद्यांनी झळकावले बॅनर्स

नाशिककडे जाणारी मिनीबस अचानक बंद पडली. नेमकं काय झाले हे पाहण्यासाठी चालक बसमधून खाली उतरला. तर बसच्या बोनेटमधून धूर येत होता आणि अचानक बसने पेट घेतला. आग लागल्याचे पाहून चालकाने बसमध्ये असलेल्या सर्व प्रवाशांना खाली उतरवले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्वांचे प्राण वाचले.

मेक्सिकोतून ३११ भारतीयांना बेकायदा प्रवेशावरून मायदेशी परत

आगीची माहिती मिळताच इगतपुरी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. बसची आग विझवण्यास अग्निशमन दलाला यश आले. मात्र या आगीमध्ये मिनी बस जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटमुळे मिनी बसला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. 

सीजे हाऊस व्यवहार प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून चौकशी