पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीचा शोध सुरु

बलात्कार (प्रातिनिधिक छायाचित्र)

राज्यामध्ये महिला आणि मुलीवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड तालुक्यातील मैंदा गावात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आम्हाला पराभव मान्य, कर्नाटकमधील निकालानंतर शिवकुमार यांचे उत्तर

मैंदा गावातील एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. रस्त्यावरुन जात असताना बळजबरीने घरात ओढत नेत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. पीडित मुलगी आजी-आजोबांसोबत राहत होती. तिचे आई-वडील ऊस तोडणीसाठी गेले होते. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

हैदराबाद एन्काऊंटर प्रकरण: एसआयटीमार्फेत होणार तपास

पीडित मुलीचे आई-वडील घरी नसल्यामुळे आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. आई-वडील कारखान्यावरुन घरी आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी आरोपीविरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर मोमीनविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.  

... अखेर राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला!