पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रोजगार निर्मितीच्या दृष्टीने माझ्याकडील खाती महत्त्वाची - नितीन गडकरी

नितीन गडकरी

देशात लहान आणि मध्यम स्वरुपाच्या उद्योगांतूनच रोजगार निर्मिती वाढेल. त्यामुळे देशाचा विकासदर वाढण्यालाही मदत होईल. लवकरच या संदर्भातील सविस्तर आराखडा आणि लक्ष्य मी निश्चित करेन, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि लघू-मध्यम उद्योग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शनिवारी पहिल्यांदाच नितीन गडकरी यांचे नागपूरमध्ये आगमन झाले. यावेळी विमानतळावर त्यांचे मोठे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शेकडो कार्यकर्ते नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते.

मोदींनी शेतकरी अन् व्यापाऱ्यांना दिलेला शब्द पाळला

गडकरी यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी खातेवाटपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यावर जी जबाबदारी टाकली आहे. त्याबद्दल मी समाधानी आहे, असे सांगितले. येत्या सोमवारी लघू-मध्यम उद्योग खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागांचे सादरीकरण माझ्यासमोर केले जाईल. त्यानंतरच मला हे काम कोणत्या दिशेने पुढे न्यायचे आहे, हे निश्चित करता येईल. देशात रोजगार निर्मितीच्या दृष्टीने माझ्याकडील खाती महत्त्वाची आहेत, असे गडकरी म्हणाले.

मुंबई ते नागपूर हा जगातील सर्वात मोठा द्रुतगती महामार्ग २०२२ च्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आमचे नियोजन आहे. त्याची टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर देशाच्या लोकसंख्येचा विचार करून राष्ट्रीय महामार्गांवर सव्वाशे कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प आम्ही केला आहे. त्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. राज्यातील सर्व सिंचन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

भाजपचा सामान्य कार्यकर्ता ते देशाचे गृहमंत्री, अमित शहांचा लक्षवेधक प्रवास

ग्रामीण आणि कृषी क्षेत्रात रोजगार निर्मितीची संधी निर्माण करण्याला माझे प्राधान्य असेल, असे सांगून ते म्हणाले, पंतप्रधानांनी माझ्यावर जे काम सोपविले आहे ते पूर्ण करणे याचाच मी विचार करतो. माझ्या कामाचे मूल्यमापन जनतेने करावे. माझ्यावर जी जबाबदारी टाकण्यात आली आहे. ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यात रोजगार निर्मितीला खूप वाव आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Micro Small and Medium Enterprises ministry is important for employment generation says nitin gadkari