पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ताडोबा अभयारण्यातील मीरा वाघिणीचा मृत्यू

मीरा वाघीण

चंद्रपूर येथील ताडोबा अभयारण्यातील प्रसिद्ध माया वाघिणीचा बछडा असलेल्या मीरा वाघिणीचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी अभयारण्यातील एका तलावाजवळ मीरा मृतावस्थेत आढळून आली. मीराच्या शरीरावर शिंग लागल्याच्या खुणा दिसत आहेत. त्यामुळे एखाद्या मोठ्या प्राण्याशी झुंज करताना तिचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 

आरेमधील वृक्षतोडीला सुप्रीम कोर्टाची तूर्त स्थगिती

मीरा ही दोन वर्षाची वाघीण होती. मीरा वाघिणीचा मृतेदह आज सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली. याची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, तिच्या शरीरावर शिंग लागल्याच्या खुणा दिसून आल्यामुळे एखाद्या रानगव्याशी झुंज करताना शिंग लागल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज ताडोबा व्यवस्थापनाने वर्तवला आहे. 

... यामुळे विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी
 
गेल्या वर्षभरात माया वाघिणीनं पर्यटकांना चांगलेच आकर्षित केले होते. तिची क्रेझ बघून ताडोबा अभयारण्यात तिची प्रतिकृती बसवण्यात आली आहे. या माया वाघीणीचा बछडा असलेल्या मीराचा आज मृत्यू झाला. मीरा अवघ्या दोन वर्षांचीच असल्यानं शिकारीचं तंत्र ती पूर्णपणे शिकलेली नसावी. त्यामुळं तिचा मृत्यू झाल्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे. 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस