पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मराठा क्रांती ठोक मोर्चा' विधानसभेच्या सर्व जागा लढवणार

मराठा मोर्चा (संग्रहित छायाचित्र)

मराठा समाजातील दुर्लक्षित प्रश्न मार्गी लावण्याच्या उद्देशाने मराठा क्रांती ठोक मोर्चाने थेट विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व २८८ जांगावर निवडणूक लढवण्याची तयारी त्यांच्याकडून सुरु आहे.     

महाजनादेश यात्रेचा प्रारंभ अमित शहा; तर समारोप पंतप्रधान मोदी करणार

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या नेते आबासाहेब पाटील एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, गेल्या ३५ वर्षांपासून मराठा समाज संघर्ष करत आहे. आरक्षण मिळाले असले तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी अद्यापही अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

... तर नरेंद्र मोदी यांनी देशहिताला धोका दिला - राहुल गांधी

सभागृहात खासदार-आमदार मराठा समाजाची ठोस बाजू मांडत नाहीत. सत्ताधारी आणि विरोधक सर्वच एका माळेचे मणी आहेत, अशा शब्दांत त्यांनी सध्याच्या राजकीय नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. मराठा ठोक मोर्चाने निवडणूक लढवावी, अशी मराठा समाजाची भावना असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. दुसऱ्या एका नेत्याने निवडणुकीच्या मैदानात उतरणारा चेहरा हा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला असेल, असे सांगितले.