पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...तर मनसेविरोधात कोर्टात जाणार; विनोद पाटील यांचा इशारा

राज ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील पटलावर नवी सुरुवात करण्यासाठी राज ठाकरे हिंदुत्वाची कास धरणार असल्याचे सांगितले जात आहे. तसंच मनसेचा झेंडा देखील बदलणार आहे. मनसेच्या ट्विटर हँडलवरुन मनसेचे झेंडा हटवण्यात आला आहे. मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये राजमुद्रा घेण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र यावरुन वाद निर्माण झाला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे वकील विनोद पाटील यांनी या झेंड्याला विरोध केला आहे. 

शिवभोजनासाठी आधारकार्डची सक्ती नाही: छगन भुजबळ

राजमुद्रा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिक आहे. मनसेने झेंड्यावर शिवमुद्रा वापरू नये, अशी मागणी विनोद पाटील यांनी केली आहे. मनसेच्या झेंड्याविरोधात कोर्टात जाणार असल्याचे देखील विनोद पाटील यांनी सांगितले. विनोद पाटील यांनी याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवले होते. मात्र त्याचे काही उत्तर मिळाले नाही. 

स्वयंघोषित गुरु नित्यानंद विरोधात इंटरपोलकडून नोटीस

विनोद पाटील यांनी पुढे असे सांगितले की, आम्हाला राजकारणाशी घेणे देणे नाही. मात्र राजमुद्रेचा वापर राजकीय पक्षांनी टाळावा. राजमुद्रेचा झेंड्यावर वापर केला तर राजमुद्रेचा अपमान होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. तसंच, जर मनसेने झेंड्यावर राजमुद्रा घेतल्यास त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करु असे विनोद पाटील यांनी सांगितले. 

'...हा भाजप आणि संघ परिवाराच्या बदनामीचा कट'