पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'पंकजा मुंडे काय अनेक प्रमुख नेते शिवसेनेच्या संपर्कात'

संजय राऊत

गेल्या सरकराने फक्त जाहीरातबाजीवर खर्च केला. महाराष्ट्राच्या पै पैवर जनतेचा अधिकार आहे, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी सांगितले की, पंकजा मुंडे काय राज्यातील अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. पंकजा मुंडेंबाबत  १२ डिसेंबरला कळेल, असे संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे. 

एक नवा पैसाही परत पाठवला नाही, फडणवीसांनी हेगडेंचा दावा फेटाळला

बुलेट ट्रेनचे ओझं आमच्या डोक्यावर नको. बुलेट ट्रेनसह सर्व प्रकल्पावर मुख्यमंत्री निर्णय घेतली. जनतेच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे संजय राऊत यांनी सांगितले. जो निर्णय आरे संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे त्याचे स्वागत देशभरात होत आहे. आरेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. तसंच नाणारसंदर्भातील मागणीचा मुख्यमंत्री विचार करतील, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

'..ही तर महाराष्ट्राशी गद्दारी',हेगडेंच्या दाव्यानंतर राऊत संतापले

सरकार अतिशय उत्तम चालले आहे. मंत्रिमंडळ विस्तार कधी करायचा हा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. इतर पक्ष काय बोलला त्याला महत्व नाही. कोणाला कोणते खातं आणि मंत्रिपद द्यायचे याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.  शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आणि व्हायलाच पाहिजे. त्यासाठी ४० दिवस संघर्ष सुरु होता. उद्धव ठाकरेंच्या रुपाने मुख्यमंत्री झाल्याचा आनंद झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती अतिशय गंभीर आहे असल्याचे त्यांनी सांगितले. 

'केंद्राचे ४० हजार कोटी वाचवण्यासाठी फडणवीस ८० तासांचे मुख्यमंत्री'