पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गोव्यात तरुणाला मारहाण करत हात छाटला; हल्लेखोरांना अटक

गोव्यात तरुणाच हत्या

गोव्यातल्या रायबंदर येथे जिवघेण्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा  उपचारा दरम्यान अखेर मृत्यू झाला आहे. कृष्णा कुट्टीकर या तरुणाचा गोमेकॉत रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी कृष्णावर जिवघेणा हल्ला करत त्याचा हात छाटला होता. हल्लेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेल्या कृष्णावर गेला काही दिवसांपासून गोमेकॉत रुग्णालयात उपचार सुरु होते. आज उपचारा दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. कृष्णाच्या हत्येप्रकरणी जुने गोवा पोलिसांनी ४ जणांना अटक केली होती. 

पत्नी नावाच्या गैरवापर, श्रेयस तळपदेचं सतर्क राहण्याचे आवाहन

गोव्यातील ताळगाव येथे एकनाथ जानू गावस यांच्यावर ४ जणांनी हल्ला केला होता. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी एकनाथ यांचे मित्र दिलीप आणि कृष्णा कुट्टीकर यांनी हल्लेखोरांचा रायबंदरच्या दिशेने पाठलाग केला. रायबंदर येथे त्यांनी हल्लेखोरांची गाडी पाहून त्यांना जाब विचारला असता हल्लेखोरांनी त्यांना मारहाण केली. मारहाणी दरम्यान आरोपींनी कृष्णा यांच्या हात कोयत्याने छाटला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कृष्णावर गोमेकॉतमध्ये उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान आज त्याचा मृत्यू झाला. 

आधी फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट आली अन् मग सहा लाख गेले!

जुने गोवा पोलिसांनी या हत्येप्रकरणी यश, जॅक ओलिवेरा, कमलेश कुंडईकर आणि मनीष हडफडकर या चार आरोपींना अटक केली. आरोपींना कोर्टाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी या गुन्ह्यासाठी वापरलेली गाडी आणि कृष्णाचा हात छाटण्यासाठी वापरलेला कोयता पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तसंच हल्ल्यानंतर आरोपींनी स्वत:चे फोन जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी देखील पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.