पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोकणातल्या आमराईमुळे हवेतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी

हापूस आंबा

आंबा हा फळांचा राजा. उन्हाळा हा आंब्यांचा हंगाम. या काळात रसरशीत  आंब्यांना मोठी मागणी असते. कोकण, गोवा, कर्नाटकात पिकणारे आंबे मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होतात. हे आंबे चवीला जितके फायदेशीर तितकीच आंब्याची झाडं ही पर्यावरणासाठी फायदेशीर.  एका संशोधनानुसार आमराई ही मोठ्या प्रमाणात हवेतील  कार्बन डायऑक्साइड शोषून  घेण्यास मदत करत असल्याचं समोर आलं आहे.  केवळ कोकण  किनारपट्टी भागात असलेल्या आमराई या वर्षांला २१ लाख वाहानांतून उत्सर्जित होणारा कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात, असं इंडियन काऊन्सिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्चच्या संशोधनातून समोर आलं आहे. 

महाराष्ट्र , गोवा आणि कर्नाटकात एकूण १ लाख ६ हजार २१० हेक्टर जमिनीवर हापूस आंब्याच्या बागा आहेत. या आमराईंमुळे  पर्यावरणाला फायदा होत आहे. या आमराई वातावरण बदलामुळे होणारे दृष्परिणाम  रोखण्यास मदत करत आहेत. वर्षाला जवळपास ९. ९१३  दशलक्ष टन उत्सर्जित होणारा कार्बन डायऑक्सइड या आमराई शोषून घेत आहेत. आंब्याच्या बागा या दीर्घ काळासाठी हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि तो साठवून ठेवतात. कार्बन डायऑक्साइड हा हरितगृह वायू आहे यामुळे पर्यावरणातील उष्णता वाढत जाते. मात्र कोकण, गोवा, कर्नाटकमध्ये असलेली आंब्याची झाडं हा वायू शोषून घेत आहेत. 

 महाराष्ट्रात २५ % आमराई  या मोकळ्या जागेवर आहेत तर  १७ % आमराई या पडीक जमिनीवर उभ्या आहेत. देवगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पडीक जागेवर  आंब्याच्या बागा आहेत म्हणजेच आमराईसाठी जंगलाची  जमीन ही वापरलेली नाही.  त्यामुळे मोकळ्या जागी उभी असलेली आमराई ही मानवानं तयार केलेल्या कृत्रिम  जंगलाप्रमाणे आहेत.  पडीक जमिनीवर उभ्या असलेल्या याच आमराईमुळे हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्यास मोठी मदत होत आहे अशी माहिती  इंडियन इंस्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्चच डॉक्टर गणेशमुर्ती यांनी हिंदूस्थान टाइम्सला  दिली. 

पडीक जमिनीवर उभ्या असलेल्या या आमराईमुळे कार्बन डायऑक्साइड कमी होतो त्यामुळे इथले शेतकरी कार्बन क्रेडिट विकू शकतात असंही संशोधनातून समोर आलं आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Mango orchards in the Konkan belt absorb carbon dioxide equal to annual emissions from more than 2 million vehicles