पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे टू उस्मानाबाद सायकल प्रवासाचा ध्यास

प्रथमेश तुगावकर

मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात जानेवारी २०२० मध्ये मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाचा प्रचार आणि प्रसिध्दी सर्वदूर व्हावी यासाठी विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातून एक अवलीया मराठवाड्याच्या दिशेने निघणार आहे.  बुधवारी सकाळी ६ वाजता या मोहिमेवर निघणाऱ्या सॉफ्टवेअर अभियंत्याच्या अनोख्या उपक्रमाचे स्वागत करण्यासाठी उस्मानाबादकरही उत्सुक आहेत.

संवाई गंधर्व भीमसेन महोत्सव ११ डिसेंबरपासून, दिग्गज

उस्मानाबाद येथे पहिल्यांदाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जात आहे. त्यानिमित्ताने विद्येचे माहेरघर पुणे ते मराठवाड्याचे प्रवेशद्वार उस्मानाबाद असा सायकल प्रवास करण्याचा संकल्प संगणक अभियंता प्रथमेश तुगावकर यांनी केला आहे. पुणे रेल्वेस्थानक येथून बुधवारी २० नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता तुगावकर सायकलसह उस्मानाबादच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.

चोवीस तासांत संजय राऊतांनी दुसऱ्यांदा घेतली शरद पवारांची भेट

पहिल्या दिवशी सायकलद्वारे सुमारे १०० किमी  प्रवास केल्यानंतर भिगवण या ठिकाणी तुगावकर पहिला मुक्काम करून दुसर्‍या दिवशीचा मुक्काम कुर्डूवाडी येथे करणार आहेत. तिसर्‍या दिवशी शुक्रवारी २२ नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद शहरात तुगावकर यांची सायकल फेरी पोहोचणार आहे. साहित्य संमेलनाचा प्रचार आणि प्रसिध्दी त्यासोबत तरूणाईमध्ये सायकलविषयी आस्था वाढावी याकरिता त्यांनी हा अफलातून प्रयोग अंगीकारला आहे. 

प्रदूषणाच्या मुद्यावर राजकारण करुन जिंकणं 'मुश्किल' : गंभीर

नोकरीनिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असलेले तुगावकर हे मूळचे उस्मानाबाद येथील रहिवाशी आहेत. सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत असलेले तुगावकर लवकरच विदेशातील एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीमध्ये रूजू होत आहेत. तत्पूर्वी आपल्या गावी होत असलेल्या साहित्य संमेलनाबद्दलची आस्था व्यक्त करण्यासाठी त्यांनी उत्स्फूर्तपणे सायकलफेरी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. संमेलनाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, उस्मानाबाद जिल्ह्यातील साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान त्यानिमित्ताने महाराष्ट्रासमोर यावे, असा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.