पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक! गळा चिरुन पत्नीचा खून

शिर्डी तिहेरी हत्या

आजारी पत्नीला उपचारानंतर घरी घेऊन जाताना तिची रस्त्यात गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात असलेल्या मानमोडी येथे ही घटना घडली आहे. याप्रकणी पतीविरोधात नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

नगरला राहणाऱ्या महिलेची पुण्याजवळ आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहारा तालुक्यातील फणेपूर येथील इस्माईल हनीफ पठाण हा त्याची पत्नी मुमताज वय ४० वर्षे हिला उपचारासाठी उमरगा येथील सरकारी रुग्णालयात घेऊन गेला होता. ३० ऑक्टोबर रोजी उपचारानंतर घरी घेऊन जात असताना तालुक्यातील मानमोडी येथे असणाऱ्या शिवाजी पवार यांच्या शेतात त्याने पत्नीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला. याप्रकरणी जावेद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरुद्ध नळदृग पोलीस ठाण्यात ३१ ऑक्टोबरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.