पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

औरंगाबादमध्ये पूर्ववैमनस्यातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

खासगी शिकवणीच्या मालकाची हत्या

औरंगाबादमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी राहणाऱ्या दिनकर बोराडे यांच्या कुटुंबियांची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी आरोपी अमोल बोर्डे याला अटक केली आहे.

पुण्यात पावासाने घेतला ९ जणांचा बळी; ६ जण वाहून गेल्याची शक्यता 

चौधरी कॉलनीमध्ये राहणाऱ्या बोराडे कुटुंबियांचे आरोपी अमोल बोर्डे याच्याशी नेहमी वाद व्हायचे. याचाच राग मनात धरुन अमोल बुधवारी रात्री बोराडे यांच्या घरामध्ये शिरला. सोबत आणलेल्या सुऱ्याने अमोलने दिनकर बोराडे यांच्यावर त्यानंतर त्यांची पत्नी कमलाबाई आणि मुलगा भगवान यांच्यावर सपासपा वार केले. या हल्ल्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच औरंगाबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिले. 

पुण्याला पावसाने झोडपले; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी घटनास्थळावरुन अमोल बोर्डे याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. दरम्यान, दिनकर बोराडे यांच्या मुलीने केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. या धक्कादायक घटनेमुळे औरंगाबाद हादरले आहे. 

नगरमध्ये ट्रक- कारच्या भीषण अपघात चौघांचा मृत्यू