पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चारित्र्याच्या संशयावरून मॉडेल तरुणीची प्रियकराकडून हत्या

खुशी परिहार

नागपूरमध्ये मॉडेलिंगच्या क्षेत्रात नव्याने आलेल्या एका तरुणीचा तिच्या प्रियकरानेच हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. खुशी परिहार (वय १९) असे या मॉडेलचे नाव आहे. तिच्या चारित्र्यावर संशय असल्याने आरोपीने तिचा चेहरा ठेचून अत्यंत निर्घृणपणे तिची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर अश्रफ शेख याला अटक केली आहे.

सरकारी नोकरीत गरीब सवर्णांनाही वयोमर्यादेत सूट देण्याची तयारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुशी परिहार ही नागपूरमधील राहणारी होती. तिने नुकताच मॉडेलिंगच्या क्षेत्रात प्रवेश केला होता. तिची आणि अश्रफची चांगली ओळख झाली आणि त्याचे पुढे प्रेमात रुपांतर झाले. शनिवारी सकाळी पांढूर्णा - नागपूर मार्गावर पोलिसांना एक मृतदेह आढळला. चेहऱ्यावर ठेचून हत्या करण्यात आल्यामुळे पोलिसांना लगेचच मृतदेह ओळखता आला नाही. त्यानंतर सोशल मीडियाच्या साह्याने पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. संबंधित मृतदेह खुशी परिहारचा असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. खुशी परिहार नागपूरमधील मॉडेलिंगच्या कार्यक्रमात सहभागी व्हायची. तिला याच क्षेत्रात करिअर करायची इच्छा होती. 

अश्रफ खुशीसोबतच गेल्या शुक्रवारी तिच्या गाडीतून प्रवास करीत होता. त्यानेच शनिवारी सकाळी चारित्र्याच्या संशयावरून खुशीची हत्या केली. पोलिसांनी अश्रफला अटक केली असून, त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

आता गिरीश महाजनही म्हणतात, राज्यात १० ते १५ ऑक्टोबरदरम्यान निवडणुका

या प्रकरणी नागपूर (ग्रामीण) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.