पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माळशिरसचे राष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस यांचे निधन

आमदार हनुमंत डोळस

माळशिरस तालुक्याचे आमदार हनुमंत डोळस यांचे आज (मंगळवार) मुंबईत निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाने ग्रस्त होते. बुधवारी सकाळी १० वाजता दसूर (ता. माळशिरस) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

माळशिरस हा मतदारसंघ राखीव असून त्या मतदारसंघातून ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर सैफी रुग्णालयात उपचार सुरू होते. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून ते २००९ आणि २०१४ मध्ये आमदार झाले होते.