पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संतप्त परीक्षार्थ्यांना ठाकरे सरकारकडून दिलासा, महापोर्टल बंद!

ठाकरे सरकारने महापोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाकरे सरकारने अखेर महापोर्टल सेवा बंद करण्याचा मोठा निर्णय गुरुवारी घेतला. फडणवीस सरकारच्या काळात महापोर्टलद्वारे सरकारी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये अनेक त्रुटी असल्याच्या परीक्षार्थींकडून  तक्रारी येत होत्या. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ठाकरे सरकारकडे वारंवार पाठपुरावा करुन महापोर्टल सेवा बंद करण्याची मागणी केली होती. त्याला अखेर यश आलं आहे.

...तर 'तुम्ही' सगळेच भस्मसात व्हाल; मनसेचा वारिस पठाणांना इशारा

सरकारी नोकर भरतीची प्रक्रिया करणाऱ्या महापरीक्षा पोर्टलवर मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून अनेक गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले होते.  विद्यार्थ्यांचा वाढता रोष लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याची मागणी जोरदारपणे लावून धरली होती. या सेवेत पारदर्शकता नाही अशी उमेदवारांची तक्रार असून पात्र उमेदवारांवरही अन्याय होत आहे,  त्यामुळे महापोर्टल बंद करावे,  असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते.  

वादग्रस्त वक्तव्यानंतर वारिस पठाण म्हणाले, माफी मागणार नाही!

ज्या विद्यार्थ्यांसाठी ही  व्यवस्था उभी केली त्यांचाच जर यावर विश्वास नसेल तर   विद्यार्थ्यांचा विश्वास बसेल अशी व्यवस्था निर्माण करण्याची सरकारची जबाबदारी आहे. महापरीक्षा पोर्टल रद्द करुन एक नवी पारदर्शी व्यवस्था उभा करावी, अशी मागणी  सत्यजीत तांबे यांनी केली होती.