पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

श्री साईबाबा विश्वस्त संस्थानाची जबाबदारी या IAS अधिकाऱ्याकडे

साईबाबा

राज्यातील विविध विभागातील भारतीय प्रशासकीय सेवेतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरुच आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारने शुक्रवारी पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. २००७ बॅचचे आयएएस अधिकारी ए.के.डोंगरे यांच्याकडे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता ते याठिकाणी  मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतील.  

 मनीषा म्हैसकर यांच्यासह राज्यातील या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

अभिजित बांगर यांची नागपूर टेक्स्टाईलच्या संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते २००८ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. कल्याण महावितरण विभागाच्या कार्यकारी संचालकपदी जी.एम. बोडके यांची नियुक्ती करण्यात आली असून या ठिकाणी असणाऱ्या आर.बी. भोसले यांची अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे विभाग येथे बदली करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्याच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लीना बनसोडे यांची नाशिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.