राज्यसभेच्या सात जागांसाठी राज्यात लवकरच निवडणुका होणार आहेत. भाजपसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी यासाठी तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीकडे चार जागा आल्या आहेत. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला प्रत्येकी १ जागा आणि चौथा उमेदवार हा महाविकास आघाडीच्या वतीने दिला जाईल, असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर 'एबीपी माझा'शी ते बोलत होते. बुधवारपर्यंत उमेदवार ठरवले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोना व्हायरसमुळे ऍपल ग्राहकांना वेगळाच फटका
राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि फौजिया खान यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे बोलले जाते. असे झाल्यास राष्ट्रवादीच्या खात्यात २ जागा जातात. राष्ट्रवादी दुसऱ्या जागेसाठी अडून बसल्याचे सांगण्यात येते. परंतु, काँग्रेसने प्रत्येकी १ जागा आणि चौथा उमेदवार महाविकास आघाडीच्या वतीने दिला जावा अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे चौथ्या जागेसाठी रस्सीखेच सुरु झाली आहे.
वृत्तपत्रात एक जाहिरात आली आणि राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात
यावर बोलताना थोरात म्हणाले की, फौजिया खान यांना दुसऱ्या जागी उमेदवारी देण्याबाबत राष्ट्रवादीने अधिकृत भूमिका जाहीर केली नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चर्चेदरम्यान सांगितलेले आहे. त्यामुळे त्याबाबत अधिकृत काहीच ठरलेले नाही.
गाण्याचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून कुऱ्हाडीने हल्ला
बुधवारपर्यंत उमेदवार जाहीर केले जातील. पक्ष जो उमेदवार देईल, तो आम्हाला मान्य आहे, असेही थोरात यांनी सांगितले.
पेपर अवघड गेल्याने बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या