पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाबाधितांचा आकडा २३० वर, बुलढाण्यात २ रुग्ण

रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या नर्सेस, डॉक्टरांचं कौतुक

राज्यात मंगळवारी दुपारपर्यंत १० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ही २३० वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईत ५, पुण्यात ३ आणि बुलढाण्यात २ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

विस्थापित कामगारांच्या व्यवस्थेसाठी राज्य सरकारकडून ४५ कोटींचा निधी

सोमवारी राज्यात १७ नविन रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे सोमवार दिवसाअखेरपर्यंत हा आकडा २२० होता . या १७ नवीन रुग्णांमध्ये ८ रुग्ण मुंबईचे असून ५ रुग्ण पुण्याचे, २ नागपूरचे तर नाशिक आणि कोल्हापूर येथील प्रत्येकी १ रुग्ण होता. तर सोमवारी राज्यात २ कोरोनाबाधित रुग्णाचे मृत्यू झाले होते. एकाचा मुंबईत तर दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू हा पुण्यात झाला होता. 

राज्यात  कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही दहा आहे. तर सोमवारपर्यंत ३९ कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं अशी माहितीही आरोग्य मंत्रालयानं दिली. 

दिल्लीत धार्मिक कार्यक्रमात आलेल्या ६ जणांचा कोरोनाने मृत्यू