पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यातील २७ महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर

मुंबई महानगर पालिका

राज्यातील २७ महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी जाहीर करण्यात आली.  मंत्रालयातील नगरविकास खात्यात आरक्षणाची सोडत काढण्यात आली. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर- पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली सोडत काढण्यात आल्या. खुला प्रवर्ग सर्वसाधारणसाठी मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली, सांगली, उल्हासनगर या महापालिकांसाठी सोडत काढण्यात आली. खुला प्रवर्ग  महिलांसाठी नवी मुंबई, जळगाव, भिवंडी, अकोला, पनवेल, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, चंद्रपूर या महापालिकांसाठी सोडत काढण्यात आली.

'उद्धव ठाकरेंची भेट हीच एक सकारात्मक गोष्ट'

तर, अनुसुचित जमातीसाठी वसई विरार महानगरपालिका, अनुसूचित जातीसाठी मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी सोडत काढण्यात आली. अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी अहमदनगर आणि परभणी महानगपालिकेची सोडत काढण्यात आली. मागास प्रवर्ग  महिलांसाठी नांदेड, सोलापूर, कोल्हापूर आणि मालेगाव महानगरपालिकेची सोडत काढण्यात आली. तर मागास प्रवर्गासाठी लातूर, धुळे, अमरावती महानगरपालिकेची सोडत काढण्यात आली. 

'मातोश्री' बाहेरील सेनेच्या मुख्यमंत्रिपदाचे बॅनर्स पालिकेने हटवले

दरम्यान, राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यामुळे महापौरांना ३ महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला होता. हा कालावधी येत्या २१ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे महापौर सोडत काढण्यात आली आहे. दरम्यान, येत्या २१ नोव्हेंबर रोजी राज्यातील २७ महापालिकांमध्ये  महापौर आणि उपमहापौर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे या महापालिकेवर महापौर आणि उपमहापौर कोण होणार याची सर्वांना उत्सुक्ता लागली आहे. 

पुढचं पाऊल, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून समन्वय समितीची स्थापना