पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागू होईल : चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम लवकर वाजणार असल्याचे संकेत महाराष्ट्र भाजप अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी दिले. १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान निवडणुका पार पडतील. यापार्श्वभूमीवर कुठल्याही क्षणी राज्यात आचारसंहिता लागू होईल, असे ते म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीचा फॉर्म्युला आठवड्याभरात स्पष्ट होईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

वंचित बहुजन आघाडीत RSS विचारांची लोकं घुसलेत : इम्तियाज जलील

मुंबईतील कोर कमिटीच्या जवळपास सात तास झालेल्या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी सवांद साधला.  ते म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुका आता दिसायला लागल्या आहेत. कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागू होतील. १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान विधानसभा निवडणुका पार पडतील. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या जागा वाटपाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलवण्यात आली होती.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य मंत्रिमंडळाने ३७

भाजपच्या जागा या दिल्लीवरुन ठरणार आहेत, याचा अर्थ आम्ही सर्वच्या सर्व २८८ जागांवर लढणार आहोत, असा होत नाही.  शिवसेनेसोबतच्या युतीनंतर भाजपच्या वाट्याला येणाऱ्या जागा वाटपाबाबत आम्ही अगोदरच चर्चा केली, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जागावाटपासंदर्भातील सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra state election 2019 State president of BJP Chandrakant Patil given signal of election dates and Model Code of Conduct