पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

परीक्षा (संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा ३ मार्चपासून सुरु होणार आहे. 

दहावीचे वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा

बारावीची परीक्षा मंगळवार दि. १८ फेब्रुवारी २०२० रोजी सुरू होऊन दि. १८ मार्च २०२० रोजी संपणार आहे तर दहावीची परीक्षा मंगळवार दि. ३ मार्च २०२० रोजी सुरू होऊन सोमवार दि. २३ मार्च रोजी संपणार आहे. या दोन्ही परिक्षांचे दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या mahahsscboard.in या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

बारावीचे वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा

दहावीचा पहिला पेपर हा प्रथम भाषा विषयाचा असेल. सकाळी ११ ते २ या वेळेत हा पेपर होईल. तर बारावीचा पहिला पेपर हा १८ फेब्रुवारी २०२० रोजी होईल. पहिला पेपर हा इंग्रजी विषयाचा राहिल.

फेब्रुवारी-मार्च महिन्यात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औंरगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा ९ विभागीय मंडळांमार्फत एकाचवेळी बारावी आणि दहावीची लेखी परीक्षा होणार आहे.