पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जेटलींच्या निधनानंतर भाजपने महाजनादेश यात्रा पुढे ढकलली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाच्या वृत्तानंतर भाजप पक्षासह देशभरात शोकाकुळ वातावरण निर्माण झाले आहे. अरुण जेटली यांचे आज (शनिवार) निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी त्यांनी  अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत कळताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

जेटली यांच्या निधनाच्या वृत्तानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरु असलेली भाजपची महाजनादेश यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे. २६ ऑगस्टपर्यंत महाजनादेश यात्रा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री जळगाव, भुसावळ, बोदवड, मलकापूर, नांदुरा, खामगाव आणि शेगावचा दौऱ्यावर होते. सुषमा स्वराज यांच्यानंतर काही दिवसांतच आणखी एका दिग्गज नेत्याच्या निधनाचं वृत्त वेदनादायी आहे, अशा आशयाचे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण होईल. माझ्यासह भाजप पक्षाचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत, असा उल्लेख त्यांनी आपल्या ट्विटमध्ये करत जेटलींना श्रद्धांजली वाहिली.

 

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

उल्लेखनिय आहे की, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने १ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रेला सुरुवात केली आहे. ३० ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या यात्रेच्या माध्यमातून राज्यातील जनतेपर्यंत पोहचण्याचा मानस भाजपने केला आहे. या यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील मतदार संघ पिंजून काढून सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती जनेतेपर्यंत पोहचवण्यात येत आहे. जेटली यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर २६ ऑगस्टपर्यंत यात्रा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra state BJP Maha Janadesh Yatra Postpond after former union minister and senior bjp leader arun jaitley passes away says Devendra Fadnavis