पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड-१९: राज्यात एका दिवसात २५ जणांनी गमावला जीव, मृतांचा आकडा ९७ वर

कोरोना विषाणू

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा चिंताजनकरित्या वाढताना दिसत आहे. गुरुवारी कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या आकड्यात २२९ नव्या रुग्णांचा समावेश झाला असून राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा १ हजार ३६४ वर पोहचलाय. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त हे महाराष्ट्रात आहेत. राज्यातील मृतांचा आकडाही सर्वाधिक आहे.

कोरोनाच्या जागतिक संकटातही सीमारेषेवर दहशतवाद्यांच्या 'नापाक' हालचाली

गुरुवारी विविध जिल्ह्यातील २५ रुग्णांच्या मृत्यूनंतर राज्यातील मृतांचा आकडा हा ९७ वर पोहचला आहे. यात पुण्यातील १४, मुंबईतील ९, मालेगाव आणि रत्नागिरी येथील रुग्णांचा समावेश असून मृतांमध्ये १५ पुरुष आणि १० महिलांचा समावेश आहे. कोरोनामुळे गुरुवारी ज्या २५ रुग्णांचा मृत्यू झाला त्यात १२ जण ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे होते. तर ११ रुग्ण हे चाळीस ते साठ वयोगटातील होते. यातील २१ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा आणि ह्रदयविकाराचा त्रास होता.  

कोविड १९ BMC अन् आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या आकड्यांचा ताळेबंद जुळेना!

आतापर्यंत राज्यात ३० हजार ७६६ नमुन्यांपैकी २८ हजार ८६५ जणांचे नमुने हे निगेटिव्ह आले असून १ हजार  ३६४ जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत. १२५ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून ते पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यात ३६ हजार ५३३  जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले असून ४ हजार ७३१ जण संस्थात्मक क्वॉरंटाइनमध्ये आहेत.