पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्य सहकारी बँक घोटाळा: अजित पवारांसह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

अजित पवार

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५० जणांवर ५ दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. २५ हजार कोटींचा हा घोटाळा आहे. यामध्ये अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. सुरींदर अरोरा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने या प्रकरणात ५ दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे अंबादास दानवे विजयी

राज्य सहकारी बँकेच्या चौकशी अहवालामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५० जणांवर ठपका ठेवण्यात आला होता. सूतगिरण्या तसेच इतर सहकारी संस्थांना बेहिशेबी पैसे वाटप केल्याचा ठपका राज्य बँकेवर ठेवण्यात आला आहे. सुमारे १६०० कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणात  २००१ मध्ये रिझव्‍‌र्ह बँकेच्या आदेशानुसार राज्य सरकारने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून चौकशीचे आदेश दिले होते. अहवालात तत्कालीन संचालक मंडळावरच ठपका ठेवण्यात आला होता. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: maharashtra rajya sahakari bank fraud court orders chargesheet against ajit pawar and others 50 people in this case