पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमृता फडणवीस अन् प्रियांका चतुर्वेदी यांच्यात जुंपली

अमृता फडणवीस आणि प्रियांका चतुर्वेदी

विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-शिवसेना यांच्यातील मतभेद टोकाला गेल्याचे पाहायला मिळाले. सत्तासंघर्षातील घडामोडीवेळी दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेच्या उपनेत्या प्रियांका चतुर्वेदी यांच्यात ट्विटरवर शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. दलाली मिळाल्यानंतर शिवसेना वृक्षतोड करते, असा आरोप अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला. त्यानंतर प्रियांका चतुर्वेदी यांनी त्यांना प्रत्युत्तर देताना हे भाजपचे नवे धोरणं असावे असे म्हटले आहे. 

हैदराबाद एन्काऊंटर: हुज्जत घालणाऱ्या महिला पत्रकाराला सायनाने सुनावले

रविवारी प्रसारमाध्यमातील एका वृत्ताचा दाखला देत देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकेचा बाण मारला. शिवसेना आपल्या सोयीनुसार वृक्षतोडीचा निर्णय घेते किंवा दलाली घेऊन ते वृक्षतोड करतात, असे म्हटले आहे. औरंगाबादमधील प्रियदर्शनी उद्यानात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकासाठी उद्यानात मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड केली जाणार आहे, यासंदर्भात प्रसारमाध्यमातील वृत्ताच्या आधारावर अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर तोफ डागली. अमृता फडणवीस प्रियांका चतुर्वेदी यांच्यात ट्विटर वॉर

कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याच्या पत्नीने गळफास घेऊन संपवले आयुष्य

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एकाही वृक्षावर कुऱ्हाड चालणार नाही, असे प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिउत्तर देताना लिहिलंय की, तुमची थोडी निराशाच होईल. एकाही वृक्षाची कत्तल केली जाणार नाही. औरंगाबादच्या महापौरांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. वृक्षतोडीसाठी दलाली हे  भाजपचं नवं धोरण आहे का? असा टोमणाही त्यांनी अमृता फडणवीस यांना लगावला आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: maharashtra politics devendra fdanvis wife amruta fadanvis bjp shiv sena leader priyanka chaturvedi twitter waar