पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Maharashtra Crisis : राजकीय नाट्यावरून सोशल मीडियावर हास्यकल्लोळ

(छाया सौजन्य : ट्विटर )

महाराष्ट्राचं राजकारण हे सध्या 'गेम्स ऑफ थ्रोन्स' या जगप्रसिद्ध मालिकेपेक्षाही अधिक नाट्यपूर्ण होत आहे अशा चर्चा गेल्या महिन्याभरापासूनच सोशल मीडियावर रंगल्या आहेत. गेल्या तीन दिवसांत  एखाद्या चित्रपट किंवा मालिकेतही दाखवली नसलीत इतकी  अनपेक्षित वळणं राजकीय नाट्यात आली आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अर्ध राज्य जागं होण्यापूर्वी घेतलेली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ, त्यानंतर तीन दिवसांत दोघांनी दिलेले राजीनामे  यामुळे सारेच जण चक्रावले आहेत. 

सत्तास्थापन करणाऱ्यांना शुभेच्छा! फडणवीसांचा राजीनामा

महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यात मिनिटामिनिटाला अनपेक्षित धक्के मिळत आहेत तर दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र हास्यकल्लोळ सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीवर अनेकांची विनोदबुद्धी जागी झाली असून आपल्यातील 'सर्जनशीलतेला' त्यांनी मीम्समधून दाखवली आहे. हे मीम्स सध्या सोशल मीडियावर चर्चाचा विषय ठरत आहेत.

 

सत्तेसाठीची लाचारी तुम्हाला लखलाभ, फडणवीसांचा सेनेला टोला