पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फडणवीस सरकारने कोट्यवधी रुपयांचा 'निर्भया निधी' वापरलाच नाही

फडणवीस सरकारने कोट्यवधी रुपयांचा 'निर्भया निधी' वापरलाच नाही

महिलांवरील वाढत्या अत्याचारामुळे देशात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्र आणि ईशान्य भारतातील ४ राज्यांनी तब्बल १० हजार कोटींचा निर्भया निधीच वापरला नसल्याचे समोर आले आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर केंद्र सरकारने देशभरातील राज्य आणि केंद्र सरकारला राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया निधी सुरु केला आहे. त्याप्रमाणे संबंधित राज्यांना निधी पुरवला जातो. पण मागील फडणवीस सरकारने हा निधीच वापरला नसल्याचे कैलाश सत्यर्थी चिल्ड्रन्स (केएससीएफ) फाऊंडेशनच्या अहवालातून समोर आले आहे. 

बैठकीला पंकजा मुंडे गैरहजर;चंद्रकांत पाटील म्हणाले,त्या आजारी आहेत

केंद्र सरकारने देशातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना फक्त २२६४ कोटी रुपये निधी दिल्याचे या अहवालातून समोर आले आहे. महिलांवरील अत्याचार आणि हत्यांचे प्रकार वाढल्यानंतरही केवळ २५२ कोटींचा वापर काही राज्यांनी केला. एकूण तरतूद केलेल्या रकमेच्या ११ टक्के इतकीच ही रक्कम आहे, असे केएससीएफने आपल्या अहवालात म्हटले आहे.

नाराज एकनाथ खडसेंनी दिल्लीत शरद पवारांची घेतली भेट

उर्वरित २०१२ कोटी रुपये म्हणजे ८९ टक्के रक्कम अजूनही वापराविना पडून आहे. सिक्कीम, मणिपूर, त्रिपूरा आणि मेघालय या ईशान्येकडील चार राज्यांनीही निर्भया फंडातील एक पैसाही खर्च केलेला नाही.

एकीकडे देशात महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्यामुळे जनता रस्त्यावर उतरली आहे. दिल्लीसह इतर मोठ्या शहरांमध्ये आंदोलने केली जात आहेत. तेथील राज्य सरकार महिलांवरील अत्याचार कमी व्हावेत म्हणून उपाय योजना करण्यात गुंतले आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकारने यासाठी दिलेला निधीही खर्च होताना दिसत नाही.

हैदराबाद एनकाऊंटरः '१३ डिसेंबरपर्यंत आरोपींचे मृतदेह सुरक्षित ठेवा'