पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CM ठाकरे अन् PM मोदींच्या भेटीचा मुहूर्त ठरला!

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे

राज्यातील सत्तासंघर्षानंतर महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. राज्याचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली भेट लवकरच होणार आहे. ७ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होणार असल्याचे वृत्त आहे.

पी.चिदंबरम यांची तिहार तुरुंगातून सुटका

नरेंद्र मोदी ७ डिसेंबरला पोलीस महासंचालक आणि अधिक्षकांच्या वार्षिक समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांचे स्वागत करणार आहेत. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च अर्थात 'आयसर' या संस्थेच्या बॅनरखाली ६ डिसेंबरपासून आयोजित तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील सहभागी होणार असल्याचे समजते.

अन्यायकारक गुन्हे मागे घेतले जातील: एकनाथ शिंदे

राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदावरुन भाजप-शिवसेना यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर शिवसेनेने भाजपसोबतच्या युती तोडत काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. राज्यातील या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यातील ही पहिली भेट असेल.  

...म्हणून 'पानिपत' चित्रपट प्रत्येकाने बघाच : राज ठाकरे

पुण्याचे जिल्हाअधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात होणाऱ्या या परिषदेचे आयोजन केंद्रीय गृहमंत्रालयाकडून करण्यात आले आहे. अमित शहा दोन दिवस या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावू शकतात. याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित अजित डोवालही उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra new chief minister and Shiv Sena supremo Uddhav Thackeray to meet PM Modi in Pune on Dec 7