पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांकडून स्फोट, १० पोलिस जखमी

गडचिरोलीत नक्षलवादी हल्ला

राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जात असतानाच विदर्भात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात गडचिरोलीमध्ये १० पोलिस गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. यापैकी काही पोलिसांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, घटनास्थळी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १५ पोलिस शहीद झाल्याचे वृत्त काही माध्यमांकडून देण्यात येत आहे. पण याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

नक्षलवाद प्रभावित गडचिरोली जिल्ह्यात १६ पोलिस कर्मचारी एका गाडीतून निघाले असताना नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला. घटनास्थळावरून उपलब्ध झालेल्या छायाचित्रांवरून स्फोटाची तीव्रता जास्त असल्याचे दिसते आहे.