पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मी रंग बदलू नाही! राज ठाकरेंचा बंधू CM यांना टोला

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या महाअधिवेशनात पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. झेंड्याचा रंग बदलल्यानंतर अनेकांच्या भुवय्या उंचावल्या. राज ठाकरेही रंग बदलणार का? असा प्रश्न काहींना पडला होता. पण राज ठाकरेचा रंग जो होता तोच आहे. मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो. अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला लगावला.

घुसखोरांविरोधात मनसे मोर्चा काढणार, राज ठाकरेंचं BJP ला समर्थन

राज्यातील विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर महायुतीला कौल मिळाल्यानंतर भाजप-शिवसेना यांच्यातील युतीमधील वाद चव्हाट्यावर आला होता. मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावर ठाम राहत शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस राष्ट्रावादीच्या साथीने महाविकास आघाडीच्या रुपात राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात शिवसेनेने हिंदूत्वाचा मुद्दा बाजूला ठेवल्याची चर्चा देखील रंगली. 

राज ठाकरेंनी सांगितले झेंडा बदलण्याचे कारण...

शिवसेनेने भाजपची साथ सोडल्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्यासाठी मनसेने आपल्या झेंड्याचा रंग भगवा केल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या महाअधिवेशनातील भाषणातून मनसे हिंदूत्वाकडे झुकत असल्याच्या चर्चेवरही भाष्य केले. मनसे फक्त मराठीच्या मुद्यावरच नाही तर हिंदूत्वाच्या मुद्यावरही लढेल, असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावर त्यांनी केंद्राच्या बाजूने असल्याचेही स्पष्ट केले आहे. मनसेची बदलती दिशा यशस्वी ठरणार का? हे येणारा काळच ठरवेल. पण राज ठाकरेंच्या टोमण्यावर उद्धव ठाकरे बीकेसीच्या व्यासपीठावरुन  उत्तर देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.