पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घुसखोरांविरोधात मनसे मोर्चा काढणार, राज ठाकरेंचं BJP ला समर्थन

राज ठाकर (Satyabrata Tripathy/ht)

मी धर्मांतर केलेलं नाही, मी मराठी देखील आहे आणि हिंदूही आहे.  असं सांगत मराठीला नख लावण्याचा प्रयत्न केल्यास मराठी म्हणून अंगावर जाईन आणि धर्माला नख लावण्याचा प्रयत्न केल्यास हिंदू म्हणून अंगावर जाईन, अशी गर्जना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या महाअधिवेशनातील भाषणात केली. इथं जमलेल्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो अशा शब्दांनी आपल्या भाषणाला सुरुवात करत हिंदुत्वाकडे जात असल्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले. एवढेच नाही तर सुधारित नागरिकत्व कायद्याच्या लढाईत भाजपला मनसेची साथ मिळणार असल्याचे संकेत राज ठाकरे यांनी दिले.  

राज ठाकरेंनी सांगितले झेंडा बदलण्याचे कारण...

पाकिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या मुसलमांनाना भारतातून हाकलून देण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी मनसे मोर्चा काढणार असल्याची घोषणा ठाकरे यांनी केली. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावर राज ठाकरे म्हणाले की, देशातील नागरिकांवर चर्चा होऊ शकेल. पण बाहेरुन आलेल्यांना थारा देता कामा नये. कोण कोठून आले आहे आणि कोणत्या ठिकाणी राहत आहे याची संपूर्ण माहिती पोलिसांकडे आहे, असा दावाही राज ठाकरे यांनी केला. सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीच्या मुद्यावर अचानक मोर्च कसे निघाले? जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याचा आणि अयोध्या प्रकरणातील निकालाचा राग या मोर्चातून व्यक्त होत आहे. बाहेरील देशातील मुस्लीमांना साथ का द्यायची? असे प्रश्न उपस्थित करत राज ठाकरेंनी पाकिस्तान आणि बांगलादेशमधून देशात घुसलेल्यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारच्या सोबत असल्याचे म्हटले आहे.    

 

मनसे झेंडा वाद: संभाजी ब्रिगेडकडून राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल

या आंदोलनात  पक्षाच्या संघटनात्मक गोष्टी सांगण्यापूर्वी त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना सोशल मीडियाच्या वापरावरील फालतूपणा खपवून घेणार नाही असे बजावले. जर भविष्यात सोशल मीडियावर कोणी अनुचित प्रकारची पोस्ट केली तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल, असे त्यांनी जाहिररित्या सांगितले आहे.  मनसेचं बदलत रुप हे शिवसेनेची जागा घेण्याच्या दृष्टिने उचललेले पाऊल असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. यावरही राज ठाकरे यांनी भाष्य केले. भगवा झेंडा हा पक्षाच्या निर्मितीपासून डोक्यात होता. सध्याच्या परिस्थितीत तो आपल्यासमोर आणला तो निव्वळ योगायोग आहे. सकारात्मक गोष्टीसाठी चांगला बदल आवश्यक असतो त्याच उद्देशाने हा बदल करण्यात आल्याचे ते म्हणाले.