पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महामोर्चासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून हजारो मनसे सैनिक मुंबईत!

मनसेचा मुंबईत महामोर्चा

पाक आणि बांगलादेश घुसखोरांना हाकलून लावण्याची मागणी करण्यासाठी मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्यने मुंबईत दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांनी उचललेला मुद्दा हा कुण्या पक्षाचा नाही तर देशाचा आहे, अशा प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहेत. राज्यातील कानाकोपऱ्यातून महामोर्चासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. परप्रांतीयांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या राज ठाकरेंनी आता पाक-बांगलादेशातून देशात घुसखोरी करणाऱ्यांविरोधात आवाज उठवला आहे. त्यांना बळ देण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मनसे सैनिकांकडून टोल वसूली करण्यात येत नसल्याचे समोर येत आहे. 

MNS Rally : महामोर्चासंदर्भातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर

नाशिक शहरातून हजारोंच्या संख्यने मनसे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने दाखल झाले आहेत. घोटी टोलनाक्यावर या कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या ताफ्याकडून कोणताही टोल आकारलेला नाही. मनसेचा झेंडा बघून टोल घेतला जात नाही. मनसेकडून यासंदर्भात पत्र गेल्याचे बोलले जात आहे.  
नाशिकच नव्हे तर पुण्याच्या दिशेने मुंबईकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांडूनही टोल वसूली केली जात नाही.  

मनसे मोर्चा ! हे मार्ग वाहतूकीसाठी बंद तर या ठिकाणी 'नो पार्किंग'

हिंदू जिमखान्यापासून सुरु होणाऱ्या मोर्चासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. मोर्चापूर्वी दादरमधील राम मंदिरात मनसे कार्यकर्त्यांनी महाआरती केल्याचेही पाहायला मिळाले. 'राज ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है! अशी घोषणाबाजी मुंबई नगरीत दुमदुमायला लागली आहे. मनसेचा नवा झेंडा घेऊन कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: maharashtra navnirman sena chief raj thackeray pakistan and bangladesh infiltrators quit india movement huge rally in mumbai no Toll for mns worker vehicle on toll plaza