पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Maharashtra Lok Sabha Election Exit Poll 2019: एबीपी नेल्सनप्रमाणे राज्यात युतीला ३४ जागा

संग्रहित छायाचित्र

लोकसभा निवडणुकीत सत्तेच्या जवळ जाण्यासाठी लागणारे संख्याबळ मिळवण्यात उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचाच क्रमांक लागतो. महाराष्ट्रात उत्तर प्रदेश खालोखाल लोकसभेच्या ४८ जागा आहेत. जो पक्ष किंवा आघाडी यापैकी सर्वाधिक जागा जिंकेल, त्याचा सत्तेच्या जवळ जाण्याचा मार्ग आणखी सोपा झालेला असेल. महाराष्ट्रात यंदा चित्र काय राहणार हा सुद्धा औत्सुक्याचा विषय आहे.

महाराष्ट्रातील चार टप्प्यांतील मतदान २९ एप्रिल रोजी संपले होते. त्यामुळे त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण काहीसे शांत होते. आता या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर राज्यातील राजकीय हालचालींना पुन्हा एकदा वेग येईल. 

देशभरात काय चित्र राहिल

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने एकतर्फी विजय मिळवला होता. भाजप २३ तर शिवसेना १८ जागांवर यशस्वी ठरली होती. त्याचवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला अनुक्रमे दोन आणि चार अशा सहाच जागांवर समाधान मानावे लागले होते. एका जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी विजयी झाले होते. यंदा युती आपला परफॉर्मन्स गेल्यावेळेसारखाच राखणार की आघाडीची सरशी होणार हे येत्या २३ मे रोजी कळेल. पण कोणता पक्ष राज्यात सर्वाधिक जागा जिंकू शकतो, याचा अंदाज आज जाहीर होणाऱ्या एक्झिट पोलच्या माध्यमातून येईल. अर्थात हे एक्झिट पोलचे अंदाज दरवेळी खरे ठरतातच असे नाही. त्यामुळे २३ मे रोजीच खरे निकाल येतील, त्यावेळी नेमकेपणाने चित्र स्पष्ट होईल.

अपडेट्स

रिपब्लिक जन की बात - भाजप-शिवसेना युती - ३४ ते ३९, काँग्रेस-राष्ट्रवादी ८ ते १२

न्यूज २४-चाणक्या - भाजप-शिवसेना युती - ३८, काँग्रेस-राष्ट्रवादी १०

सीएनएन न्यूज १८-आयपीएसओएस - भाजप-शिवसेना युती - ४२ ते ४४, काँग्रेस-राष्ट्रवादी ४ ते ६

- रिपब्लिक टीव्ही-सी व्होटरनुसार भाजप-शिवसेना युतीला ३४ तर काँग्रेस-राष्ट्रवादीला १४ जागा मिळण्याचा अंदाज

टाइम्स नाऊ-व्हीएमआरच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला ३८ जागा तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला १० जागा मिळण्याचा अंदाज आहे. 

एबीपी नेल्सनने केलेल्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजपला १७ जागा मिळण्याचा अंदाज तर शिवसेनेलाही १७ जागा मिळण्याचा अंदाज

एबीपी नेल्सनने केलेल्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला राज्यात केवळ चारच जागा मिळण्याचा अंदाज

एबीपी नेल्सनने केलेल्या एक्झिट पोलनुसार राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात नऊ जागा मिळण्याचा अंदाज

एनडीटीव्ही इंडियावरील पोल ऑफ पोल्सनुसार महाराष्ट्रात भाजप, शिवसेना युतीला ३६ जागा मिळण्याचा अंदाज

एनडीटीव्ही इंडियावरील पोल ऑफ पोल्सनुसार राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला ११ जागा मिळण्याचा अंदाज

दोन एक्झिट पोलनुसार केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज

महाराष्ट्रात कोणता पक्ष सर्वाधिक जागा जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे आहे

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष गेल्यावेळी एक अंकी आकड्यांवरच स्थिरावले होते. ते पुन्हा दोन आकडी जागा जिंकणार का, हे बघावे लागणार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra lok sabha election exit poll 2019 seat and vote share bjp shivsena ncp congress live updates