पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजप चोरांचा पक्ष होतोय का? प्रकाश आंबेडकरांचा खोचक सवाल

प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्रतील सत्तेपासून कायम दूर ठेवण्यात आलेल्या दुर्लक्षित आणि वंचित समाजाला एकत्र करून त्यांना सत्तेत वाटा मिळवून देणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अँड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. पुणे शहरात वडार समाजाच्या मेळावाप्रसंगी ते बोलत होते.

भाजपा चोरांचा पक्ष होऊ लागला आहे की काय? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राज्यासह केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांचा दाखला देत राष्ट्रवादीसह काँग्रेसवर देखील हल्ला चढवला. राष्ट्रवादी संधीसाधूंचा पक्ष होता. त्यामुळे ज्यांना आपल्या पक्षातून जिंकता येणार नाही, असे वाटू लागले, त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेसमध्ये देखील असेच चित्र आहे. सध्याच्या घडीला काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचे अस्तित्वच धोक्यात असल्याचे विधानही त्यांनी यावेळी केले.  

प्रकाश आंबेडकर म्हणाले, काँग्रेसला १४४ जागा देऊ! ऑफर ३१ ऑगस्टपर्यंतच

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, चौकशीच्या भीतीने अनेक जण भाजपात जात असल्या कारणाने भाजप चोरांचा पक्ष होतोय की काय असा प्रश्न पडला आहे. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावरही भाष्य केले. देशातील आरक्षण धोक्यात आहे. त्यामुळे ज्यांना आरक्षण मिळाले आहे त्या सर्वांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होईल, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा ज्याप्रमाणे मुफ्ती मेहबूबा यांना वापरत काश्मीरमध्ये पाय रोवला आणि नंतर कलम ३७० हटवण्यात आलं त्याप्रमाणे सत्ता आल्यानंतर आरक्षण काढून घेतले जाईल. 

राणेंचा 'महाराष्ट्र स्वाभिमानी'पक्ष भाजपमध्ये विलीन होणार

महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकानंतर पूर्ण सत्ता भाजपच्या हाती गेली तर  आरक्षण काढून घेण्यात येईल, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केला. आरक्षित वर्गाने सावध होण्याची हीच वेळ आहे असंही त्यांनी म्हटले आहे. ऑक्टोबरच्या आधी निवडणुका झाल्या पाहिजेत. आम्ही कोणासाठी थांबणार नाही, आम्ही आगेकूच करणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra Legislative Assembly election 2019 vanchit bahujan aghadi leader prakash ambedkar target on BJP Congress And NCP in Pune