पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राणेंचा 'महाराष्ट्र स्वाभिमानी'पक्ष भाजपमध्ये विलीन होणार

नारायण राणे

आगामी विधानसभेच्या तोंडावर भाजपमध्ये दुसऱ्या मेगा भरतीच्या माध्यमातून विरोधी पक्षातील दिग्गज नेते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. १ सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सोलापूरमध्ये तर ५ सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. याच दरम्यान स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणे आपल्या 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' भाजपमध्ये विलीन करणार असून त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होईल.

आनंद शिंदेंचा राजकारणात प्रवेश; सोलापूरात केली घोषणा

नारायण राणे यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली होती. यावेळीपासून ते भाजमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगण्यास सुरुवात झाली होती. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश न करता ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ स्थापन केला.

अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर; उध्दव ठाकरेंची घेतली 

त्यानंतर ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी झाल्यानंतर नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा थंडावली होती. भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवले. शिवसेनेच्या विरोधामुळे त्यांचा भाजप प्रवेश लांबत असल्याची चर्चा देखील रंगली. मात्र अखेर आता त्यांच्या भाजप   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Maharashtra Legislative Assembly election 2019 narayan rane maharashtra swabhiman party join bjp in