पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे-मुंबईसह राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा

मुंबई पाऊस

राज्यभरातील विविध भागात पुढील पाच दिवसांत मान्सून सक्रीय राहणार आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात  ठिक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.  मुंबई आणि पुण्यात १८ आणि १९ तारखेला मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

एक दिवस पीओके भारताचा हिस्सा असेलः परराष्ट्र मंत्री एस

मराठवाड्यातील काही भागात मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. २४ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहिल, असा अंदाजही हवामान विभागने वर्तवला आहे. लातूर, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात १९ तारखेला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर १८ आणि १९ तारखेपर्यंत औरंगाबादमध्ये तुफान पाऊसाचा अंदाज आहे.  

'जागतिक मंचावर भारताच्या आवाजाला आता पूर्वीपेक्षा जास्त

विदर्भातील काही ठिकाणी  हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. १८ आणि १९ दरम्यान काही ठिकाणी अतिवृष्टीची चिन्हे आहेत.  पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा याठिकाणी  १८ ते २० दरम्यान अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्या आला आहे.