पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सीमावाद! कोल्हापुरात शिवसैनिकांनी कन्नड चित्रपटाचे शो बंद पाडले

महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यातील सीमावाद पेटला

'महाराष्ट्र एकीकरण समिती’च्या नेत्यांबद्दल कर्नाटक नवनिर्माण सेनेचे नेते भीमाशंकर पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सीमावाद पेटला आहे.  रविवारी कोल्हापूरमध्ये याचे तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. सीमावासियावरील अन्यायाच्या विरोधात युवा शिवसेनेतर्फे कोल्हापुरात निषेध नोंदवण्यात आला. शहरातील चित्रपटगृहात शिरुन शिवसैनिकांनी कन्नड भाषेतील चित्रपटाचे शो बंद पाडले.  

श्री विश्वेश तीर्थ स्वामी यांचे निधन, PM मोदींनी वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते मंडळी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या कर्नाटक नवनिर्माण सेना व कन्नड रक्षक वेदिकेचा त्यांनी निषेध केला. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील दाभोळकर चौक इथं कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचं दहनही करण्यात आले.  शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील व्हिनस कॉर्नरपरसरात असलेल्या अप्सरा चित्रपटगृहातील कन्नड चित्रपटाच शो बंद पाडले. याशिवाय महाराष्ट्र-कर्नाटक दोन्ही बाजूच्या एसटी बस सेवा बंद करण्यात आल्या आहेत.  

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद भडकण्याचे संकेत, बस सेवेला लागला 'ब्रेक'

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी भाषिकांच्या हक्कासाठी संघर्ष सुरू असतानाच कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सीमेवर जावून गोळ्या घाला, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याशिवाय शनिवारी बेळगावमध्ये मराठी पाट्या असलेल्या दुकानांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता.