पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात IPS अधिकाऱ्याचा राजीनामा

आयपीएस अधिकारी अब्दूर रहमान

लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत देखील नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील आयपीएस आधिकारी अब्दूर रहमान यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ तडकाफडकी राजीनामा दिला आहे. रहमान यांनी सोशल मीडियावर आपला राजीनामा पोस्ट केला आहे. रहमान यांच्या राजीनाम्यामुळे राज्यासह देशभरात खळबळ उडाली आहे. अब्दूर रहमान १९९७ बँचचे आयपीएस अधिकारी आहेत. अब्दूर रहमान यांची वायरलेस उपमहानिरीक्षक पदावररुन बढती होऊन मानवी हक्क आयोगाचे महानिरीक्षक पदी नियुक्ती झाली होती.

राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक १२५-१०५ अशा फरकाने मंजूर

अब्दूर रहमान यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या राजीनामा पत्रामध्ये असे म्हटले आहे की, 'नागरिकत्व सुधारणा विधेयक हे भारताच्या धार्मिक एकतेविरोधात आहे. मी न्यायप्रेमी लोकांना विनंती करतो की सर्वांनी लोकशाही पद्धतीने या विधेयकाला विरोध करावा, असे आवाहन त्यांनी केले आहेत. तसंच, राज्यसभा आणि लोकसभेत या विधेयकाबाबत प्रस्ताव मांडताना गृहमंत्रालयाकडून अनेक चुकीच्या गोष्टी, तर्क-विर्तक आणि भ्रमबाबत सूचना दिल्या आहेत. या विधेयकामागे मुस्लिम समाजामध्ये भिती निर्माण व्हावी आणि देशाचे विभाजन व्हावे ही मानसिकता आहे, असे अब्दूर रहमान यांनी म्हटले आहे. दरम्यान, गुरुवारपासून मी कामावर न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे देखील त्यांनी या पत्रात सांगितले आहे. 

राहुल-रोहित-विराट या त्रिदेवांसमोर विंडीज संघ हतबल