पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही : उद्धव ठाकरे

पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर कॅबिनेटची बैठक पार पडली. यावेळी सरकारी कार्यालये पुढील सात दिवस बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असल्याची चर्चा रंगली होती. अत्यावश्यक सेवा वगळून अन्य कार्यालयांचे कामकाज बंद ठेवण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. कमी कर्मचाऱ्यांमध्ये काम करण्यासंदर्भात विचार सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

कोरोना: गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट १० वरुन ५० रुपये

यापूर्वी राज्यातील काही खासगी कंपन्यानी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तर आयटी क्षेत्रातील काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी दिली आहे.   

निर्भया प्रकरण : घटनेच्या दिवशी दिल्लीत नव्हतो, दोषींकडून नवी

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या घडीला राज्य कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या दुसऱ्या टप्प्यावर आहे. यात वाढ होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी सरकारकडून घेतली जाईल, असे आश्वासन आरोग्यमंत्र्यानी दिले होते. याच पार्श्वभूमीवर सरकारने आणखी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra in phase 2 of coronavirus infection trying to avoid phase 3 State Government take Decision to government offices closed 7 days