पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्य सरकार रोज १० लाख लिटर दुधाची खरेदी करणार, हा आहे दर...

कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील दूध व्यवसाय, दूध उत्पादक शेतकरी संकटात आहे.

कोरोना विषाणू संक्रमण संकटाच्या पार्श्वभूमीवर दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज दहा लाख लिटर दूधाची २५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करणार आहे. येत्या चार-पाच दिवसांत हे संकलन सुरु होईल आणि कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत पुढचे दोन महिने ही खरेदी सुरु राहील, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. 

माझ्या क्षमतेचा योग्य वापर केला नाही, उमेशचा निवड समितीला 'बाऊन्सर'

कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील दूध व्यवसाय, दूध उत्पादक शेतकरी संकटात आहे. दूध विक्री घटल्यामुळे गावागावात दूध स्विकारले जात नाही. राज्यात उत्पादित १२ लाख लिटर दुधापैकी १० लाख लिटर दूध अतिरिक्त ठरत आहे. खासगी बाजारात दूधाचा दर १५ ते १७ रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली घसरला आहे. शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब दूध उत्पादकांना याचा फटका बसत आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच कोरोनाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी राज्यात अतिरिक्त ठरत असलेले १० लाख लिटर दूध दूधसंस्थांच्या माध्यमातून सरकार २५ रुपये प्रतिलिटर दराने खेरदी करेल. त्या दूधाची भूकटी करुन ती साठवली जाईल. नंतर त्याची ऑनलाईन विक्री केली जाईल, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. राज्य दूध महासंघाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार असून यातून शेतकऱ्यांना आधार व दिलासा मिळेल. यासाठी साधारणपणे २०० कोटी रुपये निधी लागेल, असे अजित पवार यांनी सांगितले.

कोरोना इम्पॅक्ट : सरकारी कर्मचाऱ्यांच्या, आमदारांच्या वेतनात मोठी कपात

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, दुग्धविकासमंत्री सुनील केदार, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक आदींसह वरिष्ठ अधिकारी व दूध महासंघाचे व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.