पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चूलमुक्त आणि धूरमुक्त महाराष्ट्रासाठी सरकार गॅस जोडण्या देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र शासनाने अनेक महत्वपूर्ण योजनांची घोषणा केली आहे. चूलमुक्त धूरमुक्त महाराष्ट्र या घोषणेंतर्गत राज्यातील बिगरगॅस जोडणी धारकांना राज्य शासनाकडून गॅस जोडण्या वितरित करण्यासाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि विस्तारित प्रधानमंत्री उज्ज्वला योजना-२ अंतर्गत लाभ न मिळू शकलेल्या नागरिकांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.  योजनेसाठी या आर्थिक वर्षामध्ये १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये या योजनेची प्राधान्याने अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती बैठकीमध्ये देण्यात आली आहे. 

खूशखबर!, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनाही सातवा वेतन आयोग

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि विस्तारित प्रधानमंत्री उज्ज्वला योजना-२ यांच्यासाठी असलेल्या निकषांमध्ये पात्र न ठरणाऱ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.  मात्र, अशी कुटुंबे अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील राज्य शासनाच्या शेतकरी योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक आहे. ही गॅस जोडणी कुटुंब प्रमुख प्रौढ स्त्रीच्या नावाने मंजुर करण्यात येणार आहे. एक शिधापत्रिकाधारक कुटुंब एक गॅस जोडणी मिळण्यास पात्र राहील. प्रत्येकी एक गॅस जोडणी वितरित करण्यासाठी प्रती जोडणी याप्रमाणे लागणाऱ्या ३८४६ रुपये खर्चाचा भार शासन उचलणार आहे. त्यासाठी १०० कोटी इतक्या खर्चाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

मराठवाड्यात एका दिवसात ४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

राज्यात सध्या ४१ लाखाहून अधिक कुटुंबांकडे गॅस जोडणी नाही. यातील बहुतांशी कुटुंबांना यंदाच्या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस जोडणी दिली जाणार आहे. उर्वरित कुटुंबाला राज्याच्या या योजनेतून गॅस जोडण्यात येऊन ३१ मार्च २०२० पर्यंत महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना गॅस जोडणी देऊन चूलमुक्त धूरमुक्त महाराष्ट्र साकारण्याचा शासनाचा निर्धार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर सहनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे.

महाजनादेश यात्रेचा प्रारंभ अमित शहा; तर समारोप पंतप्रधान मोदी करणार