पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शालेय विद्यार्थ्यांना यापुढे सरकारकडून मोफत चष्मे

शाळेतील विद्यार्थी (संग्रहित छायाचित्र)

राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील सहा ते १८ वर्षे वयोगटातील मुलांमधील दृष्टिदोष निवारण्यासाठी त्यांना मोफत चष्मे पुरविण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेसाठी सुमारे २० कोटी रुपये अनावर्ती व ५ कोटी रुपये आवर्ती खर्च अपेक्षित आहे.

तामिळनाडूतील बस- ट्रकच्या भीषण अपघातात २० जण ठार, १५ गंभीर

सध्या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शालेय मुलांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करण्यात येते. या वर्षात ११९५ वैद्यकीय पथके यासाठी कार्यरत असून त्यांच्या तपासण्यात दृष्टिदोषाचे प्रमाण वाढलेले आढळले आहे. शाळांमध्ये एक कोटी २१ लाख ६७ हजार ५८५ इतकी मुलं शिकत असून दृष्टिदोषाचे प्रमाण आठ टक्के इतके आहे. या मुलांना चष्मे उपलब्ध करून दिल्यास एकूणच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत सुधारणा होईल. एका चष्म्याची सरासरी किंमत २०० रुपये असून २५ टक्के विद्यार्थ्यांचा चष्म्याचा नंबर पुढील वर्षात बदलण्याची शक्यता असल्याने त्यासाठी देखील खर्च अपेक्षित आहे.

मुंबईतल्या चार पंचतारांकित हॉटेल्सनां बॉम्बनं उडवण्याची धमकी

दृष्टिदोष असलेल्या मुलांना सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे निश्चित करण्यात आलेल्या पुरवठादाराकडून त्याच्या घरी अथवा शाळेत मोफत चष्मा पोहोचविण्यात येईल.