पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

२६ जानेवारीपासून १० रुपयांत थाळी मिळणार, मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्री

गरीब आणि गरजूंना अवघ्या १० रुपयांत जेवणाची थाळी देण्यासंदर्भातील 'शिवभोजन' योजनेच्या अंमलबजावणीला २६ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी यासंदर्भात आढाव घेतला असून प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर ही योजना सुरु करण्यासंदर्भात त्यांनी निर्देशही दिले आहेत.    

एकर आणि हेक्टर यातील फरक कळतो का? चंद्रकांत पाटलांचा CM ठाकरेंना टोला

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन योजनेची घोषणा केली होती. प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला ५० ठिकाणी १० रुपयांत जेवणाची थाळी देण्यात येणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. शिवभोजन योजनेअंतर्गत भोजनालयात प्रत्येकी ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम भात, १०० ग्रॅम वरण असलेली थाळी अवघ्या १० रुपयांत देण्यात येणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी) यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडी सरकार 'शिवभोजन थाळी' योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात जीआर जारी केला आहे. या जीआरनुसार दररोज एकूण १८ हजार थाळी वितरित करण्याचे नियोजन आहे.   

CAA : केरळ मुख्यमंत्र्यांचे CM ठाकरेंसह ११ मुख्यमंत्र्यांना पत्र

जिल्ह्याच्या मुख्यालयात 'प्रायोगिक तत्त्वावर' तीन महिन्यांसाठी किमान एक केंद्र सुरू केले जाईल. या योजनेत दिलेल्या प्लेटफूलमध्ये दोन चपात्या, एक वाटी भाजी, तांदळाचा एक भाग आणि एक वाटी 'डाळ' असते. प्रति प्लेट दर ५० रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. योजनेअंतर्गत जेवण देणाऱ्या मेस, सेंटर, खानावळ तसेच एनजीओला लाभार्थींकडून प्रति प्लेट फक्त १० रुपये जमा करतील. उर्वरित रकमेचे अनुदान सरकारकडून देण्यात येणार आहे. प्रत्येक थाळीमागे ४० रुपये खर्च सरकार उचलेल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: maharashtra government shiv bhojan scheme implement from 26 january 2020 order by cm uddhav thackeray