पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यातील ११ हजार कैद्यांना पॅरोलवर सोडणार: गृहमंत्री

गृहमंत्री अनिल देशमुख

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. तर दुसरीकडे राज्य सरकार देखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. अशामध्ये राज्य सरकारकडून गुरुवारी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्यातील ११ हजार कैद्यांना तातडीने पॅरोलवर सोडण्यात येणार आहे. तशा सूचना संबंधित प्रशासनांना दिल्या असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

मोठा निर्णय: राज्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकानं २४ तास सुरु राहणार

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की, '७ वर्षेकिंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील ६० तुरूंगांतील जवळपास ११,००० आरोपी किंवा गुन्हेगारांना तातडीने पॅरोल देण्याचे आदेश दिले आहेत. तसंच, पुढील आठवड्याभरात यावर कारवाई व्हावी अशाही सूचना संबंधित प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाशी लढा : राष्ट्रवादीचे आमदार-खासदार एक महिन्याचे वेतन देणार

दरम्यान, राज्यात कोरोना विषाणूने कहर केला आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आतापर्यंत राज्यात १२४ नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून ४ कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १८ कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

लॉकडाऊनमध्ये घराबाहेर गेल्यामुळे भावाची हत्या