पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना विषाणू इफेक्ट; अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारपर्यंतच

विधानभवन

राज्यात पुणे, मुंबई आणि नागपूरमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. राज्य सरकारकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. कोरोना विषाणूशी लढण्यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या शनिवारपर्यंतच चालणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव विधिमंडळात आवाजी मतदानाने संमत झाला आहे. विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनीच हा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव संमत होण्यापूर्वी विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी कोरोना संबंधात भाष्य केले.

काळजी नको, कोरोनातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य ती उपाययोजना करत आहे. अधिवेशन काळात दोन्ही सभागृहाचे मिळून ३५० आमदार असतात. आमदार आता मतदारसंघात उपस्थित राहिले तर त्याचा जास्त उपयोग होईल. त्यामुळे शनिवारपर्यंत अधिवेशन सुरु ठेवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी संपर्क साधला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही याबाबत बोलण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बैठका न घेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेण्यास सांगितले असल्याचेही त्यांनी म्हटले. 

महिला टी-२० विश्वचषक फायनल पाहण्यासाठी आला होता कोरोना

यावेळी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आपले मत व्यक्त केले. राज्यातील इतर ठिकाणच्या नागरिकांसह त्यांच्या मतदारसंघातील काही नागरिक इराणमध्ये अडकल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने परदेशात अडकलेल्या महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी कक्ष उभारण्याची सूचना भातखळकर यांनी केली. 

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra Government passed resolution in the lower house of the State Assembly for curtailing assembly budget session amid Coronoavirus scare