पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विजय सिंघल ठाणे महापालिकेत आयुक्तपदी

मंत्रालय

राज्य सरकारने भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. विजय सिंघल यांची ठाणे महापालिकेत आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. रणजित कुमार यांची माहिती-तंत्रज्ञान विभागात संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

कोरोनाचा परिणाम: मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा राहणार बंद

अधिकाऱ्यांचे नाव आणि नियुक्तीचे ठिकाण
१. रणजित कुमार यांची नियुक्ती संचालक, माहिती तंत्रज्ञान मुंबई या पदावर
२. एमजी अर्दड यांची नियुक्ती आयुक्त, मृद व जलसंधारण औरंगाबाद या रिक्त पदावर
३. विजय सिंघल यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे या पदावर
४. एल एस माळी यांची नियुक्ती उपसचिव, ग्रामविकास विभाग, मुंबई या रिक्त पदावर
५. अभिजीत बांगर यांच्या बदली आदेशामध्ये अंशतः बदल करून त्यांची नियुक्ती अतिरिक्त विभागीय आयुक्त, नागपूर विभाग नागपूर या रिक्त पदावर
६. यू. ए. जाधव यांच्या आदेशामध्ये अंशतः बदल करून त्यांची नियुक्ती उपसचिव, ग्रामविकास विभाग मुंबई या रिक्त पदावर
७. मदन नागरगोजे संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई, यांची नियुक्ती सहसचिव, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई या रिक्त पदावर

निर्भया प्रकरणातील दोषींना शुक्रवारी फाशी, मुकेश सिंहची याचिका फेटाळली