राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अशात कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोविड-१९ रुग्णालये म्हणून घोषीत केली आहेत. या रुग्णालयांमध्ये फक्त कोरोनाबाधित रुग्णांवरच उपचार केले जाणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Maharashtra Government has declared 30 government hospitals of the state as #COVID19 hospitals. A total of 2305 beds are available in these 30 COVID-19 hospitals: State Health Ministry
— ANI (@ANI) April 2, 2020
कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या भागांत एँटिबॉडी टेस्ट घ्या, ICMR चे निर्देश
कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. कोरोना उपचारासाठी घोषीत करण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये २३०५ खाटा उपलब्ध असणार आहेत. आरोग्य विभागाने अधिसूचना काढत ही माहिती दिली आहे. कोविड-१९ रुग्णालय म्हणून घोषीत करण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोविड१९ फॅक्टसाठी पोर्टलची निर्मिती
तसंच, राज्यात चाचण्यांची सुविधा वाढविताना आवश्यकता भासल्यास रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष करण्यात आले आहेत. मात्र कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता रुग्णांच्या उपचारासाठी विशेष रुग्णालये घोषीत करण्यात आली असून त्यासाठी आरोग्य संचालकांनी अधिसूचना काढली असल्याचे, आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
लॉकडाऊनः एका आठवड्यात वाढल्या घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी
खालील शासकीय रुग्णालयांना कोविड-१९ रुग्णालय घोषीत -
- ठाणे जिल्हा रुग्णालय, टी. बी बिल्डींग - १०० खाट
- मीरा भाईंदर - पंडीत भीमसेन जोशी रुग्णालय - १०० खाट
- वाशी - सामान्य रुग्णआलय - १२० खाट
- कल्याण डोंबिवली - म.न.पा - शास्त्री रुग्णालय - १०० खाट
- रायगड - पनवेल उपजिल्हा रुग्णालय - १०० खाट
- नाशिक- कुंभमेळा बिल्डिंग व महानगरपालिका कठडा हॉस्पिटल- अनुक्रमे १०० आणि ७० खाट
- अहमदनगर - जिल्हा रुग्णालय - १०० खाट
- नंदूरबार - डोळ्यांचा दवाखाना - ५० खाट
- धुळे - जिल्हा रुग्णालय शहरातील इमारत- ५० खाट
- पुणे- जिल्हा रुग्णालय औंध - ५० खाट
- सातारा- सामान्य रुग्णालय - ६० खाट
- सिंधुदुर्ग - नवीन इमारत एएमपी फंडेड - ७५ खाट
- रत्नागिरी - सामान्य रुग्णालय- १०० खाट
- कळंबोली उपजिल्हा रुग्णालय - ५० खाट
- औरंगाबाद - जिल्हा रुग्णआलय - १०० खाट
- हिंगोली - जिल्हा रुग्णालय- १०० खाट
- हिंगोली - कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय - ५० खाट
- लातूर - उदगीर उपजिल्हा रुग्णालय - ५० खाट
- उस्मानाबाद - जिल्हा रुग्णालय, नवीन इमारत - १०० खाट
- उमरगा उपजिल्हा रुग्णालय टीसीयू बिल्डींग - ५० खाट
- तुळजापूर - उपजिल्हा रुग्णालय नवीन इमारत - ५० खाट
- नांदेड- जिल्हा रुग्णालय- ५० खाट
- मुखेड उपजिल्हा रुग्णालय- ५० खाट
- अमरावती - विशेषोपचार रुग्णालय नवीन इमारत - १०० खाट
- वाशीम जिल्हा रुग्णालय, डीईआयसी इमारत - ५० खाट
- बुलढाणा- स्त्री रुग्णालय - नवीन इमारत - १०० खाट
- वर्धा - सामान्य रुग्णालय - ५० खाट
- भंडारा - सामान्य रुग्णालय - एएमसीएच विंग नवीन इमारत - ८० खाट
- गडचिरोली - जिल्हा रुग्णालय - १०० खाट